आमची ओळख

२००१ साली अनिल ओक आणि आसावरी ओक या दांपत्याने फळ प्रक्रिया उद्योग “कोकण – रुची उत्पादने” या नावाने सुरु केला. २०१३ पासुन जयश्री किशोर बर्वे व ओंकार किशोर बर्वे हे देखील या उद्योगात त्यांचे पार्टनर म्हणून सहभागी झाले. सुरवातीला ३ उत्पादनापासुन सुरु झालेला व्यवसाय आज १४ खाद्यपदार्थांचे उत्पादन करीत आहे. आज कोकण-रुचीची उत्पादने पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली या भागात पोहोचलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात उत्पादने पोहोचवणे हे कोकणरुचीचे ध्येय आहे.                     

आसावरी ओक यांनी सामाजिक संस्थेमध्ये ६ वर्ष कार्य केले आहे. 

खासियत

  • ९९% महिला कर्मचारी काम करतात.
  •  खाद्य- पदार्थ तयार करताना पूर्णपणे स्वच्छता बाळगली जाते
  •  उत्पादनासाठी दर्जेदार कच्चा माल वापरला जातो.

वैशिष्ट्ये

  • पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांमध्ये कोकण रुचीची उत्पादने पोहोचली आहेत.
  • जिभेवर रेंगाळणारी आणि न बदलणारी चव आमच्या उत्पादनातून मिळते. 

उद्दिष्ट्ये

  • अधिकाधिक लोकांपर्यंत उत्कृष्ट चवीची उत्पादने पोहोचवणे .
  • कोकणात तयार होणाऱ्या फळांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन करणे.